About Us

माझी पत्नी सौ.उज्वला बोराडे व माझे कुटुंब यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रकल्प येथे साकारलाय. शहरी तसेच ग्रामीण भागातील पिढीला आपल्या वाडवडिलांच्या समृध्द  ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देता येईल, या पद्धतीने या केंद्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्मिती,  स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मार्केट व योग्य दर उपलब्ध होण्यासाठी या कृषी पर्यटन क्षेत्राचा उपयोग होईल.

चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्र हे 6 एकर परिसरामध्ये वसले आहे. येथे 105 चिंचेची झाडे व 675  आंब्याची झाडे आहेत. या व्यतिरिक्त लाल जट्रोफा, मधुमालती, बकुळी, जास्वंद, अंजीर,रातराणी, पारिजातक, मोगरा, देशी गुलाब,चिक्कू, मोसंबी, जाई, जुई, ख्रिसमस,पेरू, मोरपंखी, गवती चहा, लिंबू, निशिगंधा, कडीपत्ता, वॉटर अप्पल, देशी पेरू,सोनचाफा, कवठी चाफा, पुडीका चाफा, संत्री, लिची, स्वस्तिक,दालचिनी,लौग,मिरी,इलायची,बनारसी पान, मगई पान, बिळूर पान,आंबा, नारळ, केळी, आवळा, वॉटर लिली, पुदिना, अप्पल बोर, लाल बोर, सफरचंद, शिकेकाई, गोड चिंच, अबोली, आळु,शेवगा , चेरी टोमॅटो, बदाम, रबर, कर्दळी, शेर, साग इत्यादी फळे, फुले व भाज्या बघण्यास व अभ्यासास मिळतील

वेगवेगळी फोटोग्राफी जसे प्री वेडिंग, वेब सीरिअल, मॉडेलिंग साठी सुद्धा चिंच विसावा हे ठिकाण मस्तच!  राहण्याची उत्तम सोय उपलब्ध 

स्विमिंग पुल, रेन डान्स, ट्रॅक्टर ट्रेन, रस्सीचा डोंगर व मुलांचे पार्क हे आत्ता तरुण व वयस्कर या सर्वांचेच खास आकर्षण झाले आहे 

राहण्यासाठी शीतल निवास, रवी निवास व सावली निवास अशी 3 लाकडी घरे ज्याला आपण झोपड्या म्हणतो जिथे नैसर्गिक AC लावण्याचा अनुभव येणारच. कुटी १९०० हे  प्रदर्शन रूप घर आहे येथे आपणास जाते, चूल, उकळ, मडक्याची उतरंड, शिंके, दिवा व  ठाणवी, फनेरपेठी- आरसा व हळदी कुंकु साठी बघायला मिळेल. हे सर्व पाहून आपल्या  आजी आजोबांचे जीवन हे किती सुंदर होते याची कल्पना येईल आणि हेवा वाटेल आणि म्हणाल, हेचि देगा देवा!  या सर्व गोष्टी आणि निसर्ग म्हणजे फोटो काढण्यास जणू पर्वणीच आणि त्यातच भर म्हणजे आम्ही  पारंपरिक वेष देतो जेणेकरून आपण शेतकरी, आजी आजोबा यांच्या  वेशात दिसू शकाल.